|| श्री राम ||

दि. ६ ऑगस्ट २०१६

सनवल्ड करंडक आंतरज्येष्ठ नागरिक संघटना एकांकिका स्पर्धा वर्ष ५ वे.

माननीय,
सनवल्ड फोर सिनीअर संचालिका  डॉ. रोहिणीताई पटवर्धन व   सहाय्यक शैलजाताई नायडू

आपणास सस्नेह नमस्कार. आपण आयोजित केलेले “नाट्य मार्गदर्शासाठी ” वर्कशॉप अतिशय सुंदर झाले. पेपरमध्ये जाहिरात वाचल्यापासून येण्याची खूपच इच्छा होती, पण अडचणी खूप होत्या.पण शैलजाताईशी फोनवर बोलल्यामुळे माझा उत्साह व उत्कंठा पण वाढली व येण्याचे
निश्चित ठरवले.
ज्येष्ठांसाठी त्याची नितांत गरज होती व ती गरज आपण उत्कृष्टपणे निभावली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात , प्रश्नोत्तरे, शंका अशा माध्यमातून अत्यंत रंजक कार्यक्रम झाला.
याचे सर्व श्रेय आपणाकडे , नियोजक, संयोजक, प्रमुख पाहुणे यांच्याकडे जाते.
१) बारीक सारीक वाटणाऱ्या गोष्टी रंगमंचावर किती महत्वाच्या असतात ते कळले.
२) निरीक्षण, वाचन, एकाग्रता, देहबोली, संवाद, शब्दोच्चार, ड्रेपरी, प्रकाश योजना याबाबतही अमुल्य
टीप्स मिळाल्या.
३) सर्वात आवडलेला भाग म्हणजे रंगमंचावर निर्जीव गोष्टी सुद्धा व्यक्तिरेखा म्हणून कशा
सजीव होतात. व्वा ! खूप छान. !! वेगळा दृष्टीकोन मिळाला. ज्या गोष्टींचा आम्ही विचारही केला नव्हता.
याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होणार आहे. स्पर्धेत सादरीकरणात तर होईलच, पण आयुष्यात सुद्धा उपयुक्त आहेत.
आपण या आयोजित केलेल्या वर्कशॉप बद्दल पुन्हा सगळ्यांना शतशः धन्यवाद.
आपणा सर्वांची आभारी आहे.आपल्या सर्व उपक्रमाला शुभेच्छा-

सौ. प्रतिभा प्रकाश हर्डीकर
नवी पेठ,
वैकुंठ जवळ, प्रगती बंगला.
हर्डीकर कुरिअर, पुणे
फोन क्र. – २४५३११११
भ्रमणध्वनी क्र. – ९४२२०१५९६८.Videos