सनवर्ल्ड फॉर सिनियर्स – ज्येष्ठ सहनिवास
मु. पो. खानापूर, पानशेत रस्ता,
पाण्याच्या टाकीजवळ, ता. हवेली,
जि. पुणे. 411025.

वृद्धाश्रम म्हटले की डेळ्यापुढे येणाऱ्या चित्रापेक्षा एकदम वेगळा निसर्गरम्य प्रशस्त सुखसोयीयुक्त प्रसन्न असा सनवर्ल्ड सहनिवास कोणालाही पाहाताक्षणी आवडावा असा आहे.

 • प्रशस्त खोल्या
 • अॅटॅच्ड बाथरूम
 • आकर्षक व्हरांडे
 • मंदिर
 • स्वतंत्र स्वयंपाकघर
 • स्वतंत्र जेवणघर

खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरजवळची देखणी वास्तू म्हणजे सनवर्ल्ड सहनिवास

 • सनवर्ल्ड मधील दिनक्रम
 • वेळा, पदार्थ इत्यादी… स्वच्छता इ.
 • सनवर्ल्डचा प्रवेश अर्ज.
  Download Admission Form
 • सनवर्ल्डच्या खोलीमधे असणाऱ्या सुविधा

सनवर्ल्डची वैशिष्ट्ये

 • वृद्धाश्रमामध्ये येणारा एकसुरीपणा टाळून खोल्यांचे विविध पर्याय
 • जनरेटर बॅकअप
 • सोलरचे गरम पाणी
 • बस, एस.टी.ची मुबलक सोय
 • विनंती नुसार वाहनाची सोय
 • कायमचा निवास, तात्पुरता निवास, वैद्यकीय सोयी असलेला परिपूर्ण सनवर्ल्ड सहनिवास

अपूर्वालय हॉलीडे होम

आयुष्यातला तोचतो पणा टाळण्यासाठी ज्येष्ठांच्या गरजांचा विचार करून उपलब्ध केलेले एक सुंदर हॉलीडे होम. वृद्धांना वयामुळे घर सोडून इतर कोठे जाणे शक्य होत नाही त्यांना हवी असते शांतता, रुचकर भोजन आणि समवयस्काचा सहवास. सनवर्ल्ड फॉर सिनियर्स या आगळ्या वेगळ्या वृद्धाश्रम –

नव्हे ज्येष्ट सहनिवासाचा एक भाग असणारे अपूर्वालय म्हणजे ज्येष्ठांच्या सेकंड इनिंगमधला एक हवागवासा बदल. कायमचे रहात असलेल्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा तर होतोच पण गरज पडली तर यायला एक हक्काचे ठिकाण आहे असा विश्वास ज्येष्ठांना वाटतो.

घरच्या लोकांना ट्रीपला जायचे आहे. दुसऱ्या गावी लग्नकार्याला जायचे आहे. असा वेळी स्वतः ज्येष्ठांनी येथे रहायला यायला (थोड्या दिवसांसाठी तरी यायचा) विचार केला तर ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या लोकांची खूप मोठी सोय होऊ शकते. दीर्घकाळ आजारपण असेल तर त्यांना थोडा विसावा मिळू शकतो.

अपूर्वालय हॉलीडे होम मधील सोयी सुविधा

 • डायनिंग हॉल, टेरेस (2 नं फोटो)
 • एक दिवसापासून ते कितीही दिवसांसाठी ज्येष्ठ येथे रहाण्यास येऊ शकतात. ज्येष्टाबरोबर त्यांची मुले, नातवंडे, पतवंडे, आणि इतर नातेवाईकांचेही अपूर्वालय हॉलीडे होम मध्ये स्वागत आहे.
 • साठी, सहस्त्रचंद्रदर्शन, लग्नाचा वाढदिवस यासारख्या महत्त्वाचे दिवस अपूर्वालय हॉलीडे होम मध्ये साजरे करून मनसोक्त गप्पा मारण्याचा अनुभव घेऊन पहाण्यासारखा आहे.

फॉर्म
Download Admission Form

दरपत्रक

प्रतिदिन, प्रतिव्यक्ति (ट्विन शेअरिंग) रु. 450/-

यामध्ये निवास, 2 वेळचे जेवण, 3 वेळेचा चहा, 1 नाश्ता याचा समावेश आहे.

एका खोलीत एक व्यक्ती प्रतिदिन रु. 600/-

(आगाऊ नोंदणी आवश्यक).

सनवर्ल्ड आधारगृह

बदलत्या जीवनशैलीमुळे परावलंबी व्यक्तीची सेवा सुश्रृषा करण्यासाठी घरातील व्यक्ती उपलब्ध होऊ शकत नही. परावलंबी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या सेवकवर्गावर घर सोडता येत नाही. छोटे आजार झाले तर डॉक्टर घरी येऊ शकत नाहीत.

या सर्व गरजा लक्षात घेऊन सनवर्ल्डने आधारगृह सुरू केले आहे. 24 तास डॉक्टर उपलब्ध आहेत हा सनवर्ल्डचा मोठा प्लस पॉइंट आहे. अगदी ऑक्सिजन सिलेंडर पासून ज्येष्ठांना तातडीने प्राथमिक उपचाराची सोय आधारगृहामध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजेनुसार परावलंबी ज्येष्ठाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत सर्व सेवा अगदी रास्त सेवा शुल्क आकारून येथे उपलब्ध करून दिल्या जातात. परावलंबि ज्येष्ठांच्या सेवेचा एक तपाहून अधिक काळ अनुभव असणाऱ्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली परावलंबी ज्येष्ठांची अगदी नीट काळजी घेतली जाते. डॉ. गोरे हे मेडिकल अॅड्व्हायजर म्हणून जबाबदारी सांभाळतात.

डॉक्टरांचा संदेश व्हिडिओ? खोलीमधील सोयी सह.

सेवाशुल्क फॉर्म

प्रतिदिन रु. 600/- दर महा रु. 15,000/- अनामत रु. 50,000/-

सनवर्ल्ड प्रशिक्षण केंद्र

गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्टांचे आयुष्य अगदी अनपेक्षितपणे चांगले 20 वर्षांनी वाढलेले आहे. म्हणजेच एकूण आयुष्याच्या तुलनेत जवळ जवळ ही वाढ 25 टक्के एवढी आहे. असे आयुष्य वाढेल अशी स्वतः ज्येष्ठांनाही कल्पना नव्हती, मग इतरांची गोष्टच दूर राहिली. या वाढलेल्या वर्षांमुळे खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे शोधण्याची गरज आहे पण त्यासाठी तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध हवी. हा प्रश्नच नव्याने निर्माण झाल्याने मार्गदर्शन उपलब्ध होत नाही ही परिस्थिती जाणूनच वृद्धकल्याणशास्त्र तज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी मार्गदर्शनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य सनवर्ल्ड प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सुरू केले आहे. वृद्धकल्याण शास्त्रामधील पीएच.डी. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून प्रशिक्षण, संयुक्तराष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंग या संस्थेमार्फत देण्यात येणारे आंतरराष्ट्रीय वृद्धकल्याण प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन गेली 14 वर्षे वृद्धांसाठी कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धांच्या उत्तम आयुष्यासाठी विविध विषयांवर प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. ज्येष्ठांच्या विविध संस्था संघटनांकडून त्याला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे यातून प्रशिक्षणाची उपयुक्तता सिद्ध होते आहे.

प्रशिक्षणाचे विषय पुढीलप्रमाणे

1. समृद्ध जीवनाची संकल्पना (3 तास) – निवासी कार्यशाळा (2 दिवस)

2. वृद्धाश्रम चालकांना मार्गदर्शन (1 दिवस)

3. वृद्धाश्रमाची निवड करण्यासाठी मार्गदर्शन (3 तास)

4. स्वयंस्फूर्तीने समाजसेवा (volunteering) कशी करावी (1 दिवस)

5. समस्या सोडविण्याचे तंत्र (solution Training) (2 दिवस)

6. त्वचादान, अवयवदान, नेत्रदान / मार्गदर्शनपर व्याख्यान (3 तास)

7. मोबाईल ज्येष्ठांचा मित्र – प्रशिक्षण कार्यक्रम (2 दिवस)

8. इंटरनेटशी मैत्री (1 आठवडा)

9. वैद्यकीय इच्छापत्र (Living will) आणि इच्छापत्र या (will) या संबंधी मार्गदर्शन कार्यशाळा (1 दिवस)

10. ‘आपल्यासाठी आपणच’ – ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्याचा नवा मंत्र (1 दिवस)

11. याशिवय मागणीनुसार विविध विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन

सनवर्ल्ड संशोधन केंद्र

ज्येष्ठ हा गट राज्यकर्ते समाज कुटुंब कोणच्याच प्राधान्यक्रमात वरच्या क्रमांकावर नाही हे टळटळीत सत्य आहे. ज्येष्ठांचे कसे चाललंया त्यांच्या काही समस्या आहेत का? त्यांची काळजी कोण घेणार आहे? या सारख्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही ही वस्तुस्थिती आहे. इतर घटकांचे दूर जाऊ दे पण स्वतः ज्येष्ठांना सुद्धा आपल्या भवितव्याविषयी फारशी माहिती नाही. ज्येष्ठ या घटकाविषयी कोणतीही माहिती मिळत नाही. पीएच.डी. साठी संशोधन करताना डॉ. रोहिणी यांना ही फार मोठी कमतरता लक्षात आली. विश्वसनीय आणि तपशीलवार माहिती ठराविक कालमर्यादेमध्ये उपलब्ध झाल्याशिवाय कल्याणाच्या प्रयत्नांना दिशा मिळणार नाही. हे एक फार मोठे आव्हान पेलायला हवे आहे. पण ते पेलायचे कोणी? हा प्रश्न आहे.

आव्हान पेलण्यासाठी इतरांच्या तोंडाकडे पहात बसून उपयोग नाही ही गोष्ट लक्षात घेऊन सनवर्ल्ड संशोधन केंद्राच्या माध्यमातून ‘ज्येष्ठांच्या गरजा आणि समस्यांचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पाची आखणी केली आहे. यांची प्राथमिक चाचणी चालू आहे. आर्थिक, सामाजिक, मानसिक करमणूक आणि वहानविषयक गरजा आणि समस्यांचा अभ्यास या गरजा आणि समस्यांचा अभ्यास या प्रकल्पांतर्गत केला जाणार आहे. यासाठी मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे. अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हे काम आहे. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. समाजाच्या पाठींब्यावर ज्येष्ठांसाठी अत्यंत गरजेचे असे काम हे हाती घेण्यात येणार आहे.

त्याची प्राथमिक चाचणी घेतली आहे. गरज मोठी आहे. क्रमाक्रमाने योजनांची आखणी संशोधन केंद्रामार्फत केली जाणार आहे. त्यातून वृद्धकल्याणाची दिशा आखणे शक्य होणार आहे.

फोटो – 22 फे. त्याचा फॉर्म – भरलेला फॉर्म – माहिती संकलित.

सनवर्ल्ड विचारमंच

ज्येष्ठांच्या प्रश्नांवषयी इतरांबरोबरच स्वतः ज्येष्ठांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या आवश्यकतेमधून सनवर्ल्ड विचारमंचाची कल्पना उदयास आली. एक वृद्धाश्रम हो न्यारा, वेळीच निर्णय घ्या, परावलंबित्व निभावताना या वेळेचे करायचे करी काय? वैद्यकीय इच्छापत्र या सारख्या विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून तसेच 100 हून अधिक व्याख्यानांमधून ज्येष्ठ या गटाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

2005 मध्ये झालेल्या जागतिक परिषदेतील व्यक्त झालेल्या मतानुसार ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम ज्येष्ठांनी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे याचा अत्यंत गाभिर्याने विचार करून डॉ. रोहिणी यांनी ज्येष्ठांनो गुणवत्तापूर्ण उत्तरायुष्यासाठी आपल्यासाठी आपणच या तत्वाचा प्रसार करण्यास सुरूवात केली. त्या अंतर्गत राज्यव्यापी परिषदा, चर्चासत्र, राऊंडटेबल कॉन्फरन्स आयोजित करण्याचे महत्त्वाचे आणि मोलाचे काम सनवर्ल्ड विचारमंचामार्फत केले जाते.

या कार्यशाळेत विविध वृद्धाश्रमांतील पदाधिकारी / सभासद यांनी त्यांचे अनुभव परिषदेबद्दलचे मत – व्हिडीओ क्लीप