या परिसरात आल्यावर खूप छान व प्रसन्न वाटते. डॉ रोहिणीताईच्या या आश्रमाविषयीची संकल्पना खूप आवडली. या परिसरात आल्यावर खूप छान व प्रसन्न वाटते. डॉ रोहिणीताईच्या या आश्रमाविषयीची संकल्पना खूप आवडली. श्री वीरकर यांनी खूपच छान स्वागत केले व उत्तम जेवणाची व्यवस्था केली. आदरातिथ्याबद्दल धन्यवाद! माहेरपणासाठी येथे यायला खूपच आवडेल. येथे राहणाऱ्या सर्व भगिनीही खूष आहेत हे पाहून व त्यांच्याशी गप्पा मारून बरे वाटले. “सनवर्ल्ड”ची हि भेट खरच संस्मरणीय!
पटवर्धन मैडम, एखादी गोष्ट मनात असण, ती प्रत्यक्षात उतरविण्याच स्वप्न पहान आणि त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी अखंड धावपळ करण या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत. तुम्ही असं स्वप्न प्रत्यक्षात आणलत त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले असतील हे प्रकल्प पाहून लक्षात येतय. खूप वेगळी कल्पना असलेला हा प्रकल्प पाहून खूप कौतुक आणि समाधान वाटल. काही मदत करायची संधी मिळाली तर मी मधून मधून थोडा वेळ या कार्यासाठी देऊ शकेन असं वाटतंय. मी नंबर दिलाय केव्हातरी भेटूया. धन्यवाद !
सध्याचे ज्येष्ठ हे सॅण्डविच जनरेशनचे आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट करून मुलाबाळांना वाढविले आहे. उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांनी आईवडिलांचे श्रावण बाळ बनून मनोभावे सेवा केली आहे.
कार्यशाळेमुळे वृद्धत्वाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन व विचार ऐकायला मिळाले. वृद्धाश्रम चालविणारे विश्वस्त व सेवक यांच्या ओळखी झाल्या. त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्यामुळे खूप बरे वाटलेc